Thursday 2 May 2019

अव्यक्त झालेले प्रेम .....शेवटचा भाग

                           पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र हिरवेगार असे वातावरण झाले होते . या सोनेरी पावसात ह्या दोघांचे प्रेम जोमाने फुलत होते . पण कुठे तरी कमीपणा होता कारण यांच्या आयुष्यात आलेली त्याची ती , त्यामुळे दोघे हि थोडे मागेपुढे करत होते . एकीकडे पावसाने अख्ख्या परिसरावर राज्य गाजवले होते नि दुसरीकडे  यांच्या प्रेमाला नव्याने पालवी फुटू लागली होती  . बाहेर पाऊस चालू असल्यामुळे आज कदाचित मला उशीर होईल , असे मनात फुटफूट तो कॉलेजची तयारी करू लागला .

तो - आज तिला सगळे काही सांगून मोकळा होतो , कारण माझं आयुष्य आता तिच्या बरोबर मला काढायचे आहे , पण ..... पण गार्गी चे काय ? (गार्गी हि त्याची ex gf ) हळूच श्वास रोखुन , पण मी का तिचा विचार करून ना , ती मला सॊडून गेली होती मी नाही . आज ती परत आली तर मी का माझं खरं प्रेम सोडू , आणि गार्गी वर माझं खर प्रेम असत तर स्वराचा नि माझा काहीच संबंध नसता. हे देवा ....!  डोक्याचा भुगा होण्याची वेळ आलीये आता माझ्यावर . असाच विचार करत करत त्याने आपली बाईक काढली आणि कॉलेजसाठी निघाला . मुसळधार पाऊस  कोसळत असल्यामुळे कॉलेजच्या गेट वर कोणाचा पत्ता नव्हता , तो - आली असेल ना ती आज ? नसेल आली तर सरळ जातो तिच्या घरी . नको नको उगाच काही लोच्चे व्हायचे बाबा !! . तो कॉलेजच्या कॉर्नर ला उभा होता तेवढ्यात ती त्याला दिसली . त्या पावसात ती त्या दिवसापेक्षा अजून गोड दिसत होती , तिचे अंग ओलेचिंब झाले होते . सरी चा थेंब तिच्या गालाच्या खळी बरोबर लपंडाव खेळत होता . तिला कदाचित पाऊस आवडत असा म्हणून ति काही हि विचार न करता पावसात भिजत  होती . हवेचा तो गार वारा तिच्या केसाबरोबर मस्करी करत होता  , याला मात्र त्याची चीड होऊ लागली , कारण तिच्यावर फक्त माझा हक्क आहे असे त्याला वाटत होते  . किती मी वेडा काही पण आपली बडबडत करत असतो .

       ती हसत खेळत त्या पावसाच्या सरी हातात झेलत होती , नि मध्ये डबके दिसेल तिथे उड्या मारत होती , हे तिचे रूप त्याने नव्याने पाहिले होते , म्हणून तो तिच्या अजूनच प्रेमात पडला  . स्वराचे लक्ष त्याच्याकडे जाताच ती जरा सावरली आणि आपली हळुहळु येऊ लागली . ती - अरे देवा ... हा ! याने पाहिले बहुतेक माझा बालिशपणा , काय मी वेडीच बाबा  , तो काय विचार करत असेल माझ्या बद्दल , छे बाबा काय मी पण ना !! , असो मी गपगुमाणे निघून जाते . ती त्याच्या समोरून निघू लागली , तेवढ्यात ,


तो - वाह ! काय दृश्य होते ते .
ती - (लाजत आणि मुद्दाम चेहऱ्यावर राग आणून )
तो - काय झाले , असे काय बघत आहे माझ्याकडे.
ती- दृश्य म्हणजे कुठले दृश्य ?
तो - अग मी पावसाच्या सरी बद्दल बोलतोय , एक min तुला काय वाटले ? छे छे किती तो विचार देवा देवा .
ती - ओये , मी नाही हा केला काही विचार .
तो - हो का , बर (आणि तो तिथून निघून गेला )
                             हे जे काही घडत होते ते सगळे गार्गी बघत होती तिला माहिती झाले होते , पार्थ , स्वराकडे वळल्या जातोय , आणि हे तिला पचत नव्हते ,ती रागात येऊ,  आज मी स्वराशी बोलणार, बजावणार तिला कि पार्थ फक्त माझा आहे नि दूर रहा त्याच्या पासून .तेवढ्याच तातडीने तिने स्वराला गाठले ,गार्गी - अग ये , हा तुच , काय ग , काय चालय तुझे .
स्वरा- (थोडी घाबरून आणि आश्चर्यचकित होऊन ) का ?काय झाले .
गार्गी - काय झाले , अजून मलाच विचारतेय . (थोडी थांबुन )मी पार्थ बद्दल बोलतेय , काय चालू होते तुझे , मला दिसतेय हा सगळे .
स्वरा - अग हो पण मी कुठे काय केले , नि हा तुझा जो काही प्रॉब्लेम असेल ना तो तु पार्थ बरोबर बोल , मला का उगाच मधे आणतीये . (तिथून निघून जाताच गार्गी तिचा हात पकडते )
"अग काय हे ?"
गार्गी - तू मला नको शिकऊस हा .
                      तेवढ्यात पार्थ आला  नि गार्गी चा हात पकडुन तिथून तिला घेऊन जातो . गार्गी चा हात पार्थ ने पकडताच स्वराचा उतरलेला चेहरा बघून मात्र पार्थ च्या ओठांवर हसु आले.
पार्थ - काय होते हे सगळे? (तो रागात )
गार्गी - काय म्हणजे , तिचा ना तुझ्यावर डोळा आहे .
पार्थ - (खोटं हसुन ) डोळा नाही प्रेम आहे तिचे माझ्यावर नि हा ते तुला नाही कळणार कारण ती पळकुटी नाही तुझ्या सारखी  तर please तू राहुदे नि जा इथून  .
गार्गी - अरे पण माझं पण प्रेम आहेच ना म्हणून तर मला त्रास होत आहे  .
पार्थ - तुला त्रास होत आहे कारण , तुला जे हवे आहे ते मिळत नाहीये म्हणून , तर जा इथून नि हा अजुन एक , माझं पण स्वरावर प्रेम आहे . झाले समाधान . रस्ता तुझ्यासाठी मोकळा आहे , ( गेट च्या दिशेने  हात दाखवत तो रागाने तिथून निघून गेला ).

                                      इकडे मात्र  स्वराचे अश्रू काही थांबत नव्हते . आणि स्वतःशी च बडबड करत हा बरोबर ना ती त्याची gf आहे नि तो तिच्यावरच हक्क दाखवणार मी कोण ना , पावसाच्या थेंबां बरोबर तिचे अश्रू एकरूप होत होते . तेवढ्यात पार्थ तिच्या समोर येऊन उभा राहतो , रडतीये कि पावसाचे थेंब , हे ऐकताच ती उठून निघून जाते , एक हि क्षण वाया न घालवता पार्थ त्याची मराठी कविता  सुरु करतो .

""बेधुंद त्या पावसात भिजायचं होते मला फक्त 
भिजायचं नाही तर चिंब होऊन नाचायचे होते
एक एक थेंबाना हातावर गोंजारायचे होते
 नि गार गार टपोरी थेंबांशी  खेळायचे होते 
त्या सुसाटाच्या वाऱ्या मध्ये उडायचे होते 
नि अंगावर येणारे शहारे अनुभवायचे होते 
तो  क्षण मला तुझ्या समेत घालवायचा होता
तो क्षण मला आयुष्य भर जपून ठेवायचा होता
हळूच होणारा तुझा तो स्पर्श नकळत मनात
 उदभवणारे त्या भावनांशी एकरूप व्हायचे होते 
विजा कडाडल्या वर तुझे ते मिठीत येणे आणि 
प्रेमाने केसांवरून हात मी फिरवावे हे अनुभवायचे होते
हो ग वेडा बाई बेधुंद त्या पावसात भिजायचं होते मला फक्त 
भिजायचं नाही तर चिंब होऊन नाचायचे होते. ""
                           हे ऐकताच ती पुर्ण पणे त्यात हरवून गेली . त्या पावसाने त्यांना एक अनोखा आणि अविस्मरणीय क्षण देऊ केला होता . स्वरा लाजेने गुलाबी होऊन गेली होती नि तिचे ते लाजणे बघायला तो वेडा झाला होता . तो रोमांचिक क्षण त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहणार होता . काही वेळात आकाश निरभ्र असे निळसर झाले , पाऊस हळुहळु कमी झाला , मधेच सुर्य , ढगाळलेल्या त्या काळभोर ढगांमधून वाकवल्या दाखवत सर्वांच्या समोर येऊ लागला . अगदी  सगळीकडे शांतता पसरलेले होते  . पावसाचे थेंब झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर झोका घेत होती , त्या गार वाऱ्यामुळे टुमदार झाडी आपले अंग हलवत आनंद घेत होती. आणि तोच गारवारा त्या दोघांना भिडुन गेला .

            हळूच्या त्या क्षणी तिचा हात पकड तो आपल्या गुढघ्यावर बसून आपले प्रेम व्यक्त करणार होता . तो : तुझा हात दे जरा
ती-का ?
तो - अग राणी दे कि
ती - मी का म्हणून देऊ, जा कि तुझ्या त्या गार्गी जवळ .
तो -  (थोडा चिडून )देणार कि जबरदस्ती करू .
ती- एवढी हिम्मत आहे का ?
तो- बघायची आहे?
ती - हो .
तो- ohk थांब (अख्ख्या लोकांना जमवत)" सुनो गाव वालो इस लडकी से मैं प्यार करता हूं लेकिन ये मान हि नही रही "
ती- ओये ! गप चल इथून .
तो- तिला हळूच स्वतः जवळ ओढत नि रोमँटिक होऊन love u यार .
ती- अच्छा कधी पासून .
तो- जेव्हा तू पहिल्यांदा मला पाहिले होतेस तेव्हा पासून .
ती - म्हणजे तुला माहिती होते हे सगळे .
तो - वेडी ! तिच्या गालावर चुंबन घेत ,हो
ती - (लाजून लाल झाली) मग बोललास का नाही ?
तो - हिम्मत नव्हती रे !!
ती - मग आता ?
तो- काय आता ?
ती- आता काय पुढे.
तो - काही नाही झाले सगळे .
ती - (रागात)बर जाऊ मी,
तो- हा !!
ती- नक्की !!
तो- होय नि तिचा हात अजून घट्ट करत.
ती- (प्रेमाने त्याच्या कडे बघत) काय बोलायचं बोल .
तो- लग्न करूया का?
ती-(आश्चर्यचकित होऊन) वेड लागलय तुला .
तो- हळूच आपल्या खिशा मधून अंगठी काढत तिच्या बोटात टाकू लागला .
ती- (आनंदाने  रडत त्याला घट्ट मिठी मारते) नि त्याला "हो" बोलते
                             हे सगळे दृश्य सगळे कॉलेज बघत होत नि त्यात गार्गी चा पण समावेश होता . हळूच गार्गी च्या डोळ्यांमध्ये अश्रू जमा झालीत . पण पार्थला  आनंदात बघून ती थोडी पुढे येऊ  sorry पार्थ आणि स्वरा तुला पण . यार तुम्ही परफेक्ट आहेत एकमेकांसाठी असेच रहा आयुष्यभर  . नि डोळे पुसत ती तिथून निघून गेली ,इकडे पार्थ नि स्वरा हातात हात घेऊन नि स्वरांनी आपले डोके पार्थच्या खांद्यावर टाकत आपल्या पुढच्या आयुष्याचा विचारत करत करत कॉलेजच्या गेट मधून बाहेर पडले


Tuesday 12 March 2019

अव्यक्त झालेले प्रेम .....भाग २.

                                   आज कदाचित माझी नि तिची भेट व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना तो करू लागला , डोळ्यात नवी स्वप्न आणि मनात नवी आशा घेऊन तो कॉलेजसाठी तयार झाला . आज ती कॉलेजला येईल नि माझं तिच्याशी बोलणे  होईल असे त्याला मनोमंन वाटू लागले . रोज उशीरा येणारा तो आज अर्धा तास आधीच येऊन पोहचला . आज तो खुश आणि प्रसन्न दिसत होता , अचानक त्याला ती दिसली,  आज खुप गोड नि सुंदर दिसत होती ती , लाल ड्रेस , केस खुले सोडुन , चेहऱ्यावर स्मित हास्य , ओठांवर लाल लिपस्टिक , हिलची सॅन्डल , आणि मधून मधून पडणाऱ्या सुर्याच्या किरणाने अजुन तिचे रूप खुलवून गेले होते ,

"तेरी  याद  में  तबियत  "मचल"  जाती  है...!!
वक़्त-ए-शाम की सूरत "बदल"  जाती है...!!
जब तीर ख्यालों का "चुभता" है जिगर में...!!
तो  मेरे सब्र  की नीयत  "पिघल" जाती है..."
                                          त्याच क्षणी त्याला वाटले जावं नि आपल्या गुडघ्यांवर बसुन तिला विचारावं ,  याने लगेच आपले केस ,शर्ट नीट करत थोडा सावध होत धीर दिला , ती गेट वर येऊन कोणाची तरी वाट बघत होती , तो मनात पुटपुटला "तर आलीस हा आज तु ,  मला वेड लावून स्वतःच कुठे ग गायब झालीस ? , आज भेटलीस ना !!आता बस , नाही पळणार मी माझ्या स्वतः पासून आणि तुझ्या पासून पण . आहे ते मनात आज तुला सांगून देणार आहे "  हळूच तो स्वतःला सांभाळत । अरे ओ !  काय हे काय झाले तुला,  गप बस की , किती घाई झाली तुला? आधी तिला येऊ तर दे नि आज ती नक्की स्वतःहून तुझ्याशी बोलेल बघ  . कधी न हसणारा तो आज चक्क हसतोय . नकळत तिचे त्याच्याकडे लक्ष गेले , तो हसतोय हे पाहून तिला थोडं आश्चर्य वाटले नि आनंद पण झाला . ती हळूहळू गेटमधून कॅम्पसमध्ये येऊ लागली आणि दोघांचे हृदय जोरात धडकु  लागले . गार-वारा दोघांना स्पर्श करून त्यांच्या त्यांच्या भावना व्यक्त करत होता , डोळ्याला डोळे भिडत , तर कधी क्षणर्थात लाजून डोळ्यांची पापणी अलगद झुकायची . मधेच चालु असणाऱ्या उन्ह-सावलीचा तो खेळ त्यात अजुनच तिचे सौदर्य न्हाऊन निघत होते ,  कदाचित याच दिवसाची ते दोघे वाट बघत होते . जसे जसे हे दोघे जवळ येऊ लागले तसे तसे स्वतःला सांभाळत होते . दोघे एकमेकांसमोर यायलाच लागेल तेवढ्यात त्याच्या मागून एक आवाज आला, सॉरी !!!!!!
ती (२)  - चुकले रे माझे । तुला माहिती  आहे?  जेव्हा तुझ्यापासून लांब झाले ,तेव्हा मला तुझं खर प्रेम कळाले , खरच खूप मोठी चूक झाली माझी .
तो - अग ! काय हे , तु  इथे कशी काय ? तुला कसे माहिती मी इथे आहे ?

                                      ती मात्र निशब्ध पणे शांत उभी होती , डोळ्यात खुप प्रश्न उभी झाली . हीच का ती जिच्यासाठी हा देवदास झालेला , ठीक आहे ना मग ही का परत आली आता , पण मला का याचा फरक पडत आहे , आमच्यात कुठे प्रेम नि मैत्री होते , अरे मैत्री प्रेम तर दुरच आमच्यात साधा सवांद तरी कुठे होता . असो मला काय ! मला नाही त्रास होणार याचा , ति तिच्या मैत्रिणीला हात देत ,तिथून निघून गेली. ह्या दोघात  मात्र अजुन सवांद सुरूच होता . ती विनवणी करत होती , माफी मागत होती , हा मात्र तिच्याकडे बघत होता , तीला जाताना बघु तो अस्वस्थ झाला , त्याला स्वतःचा राग येत होता . ती मात्र मला काही हि फरक पडला नाही असे दाखवून देत होती . त्रास दोघाला पण होत होता, पर "वो लव्ह स्टोरी भी क्या जीसमें गम और दिल तुटने का दर ना हो"  त्याच्या आयुष्यात असणारी त्याची पहिली gf येताच सगळे काही बिनसले होते . आजचा हा दिवस कसाबसा मावळला , एकाच क्षणात खुप काही घडून गेले होते . त्या रात्री दोघेपण त्रासून गेले होते काय करावे नि काय नाही याचा विचार ते करू लागले . तिने नेहमी प्रमाणे आपली डायरी लिहायला घेतली . न भेटता तिने 100 पाने त्याच्या बद्दल लिहून काढली होती .ती फाडून टाकावे कि तसेच राहू द्यावे म्हणून ती विचार करत होती, कारण त्याची आठवणी  तीला हुंदके देत होती .
""हरवले मन माझे तुझ्या या प्रेमात 
   बेभान झाले तुझ्या सहवासात 
  किती समजावू माझ्या या दिलाला 
  ना ऐकानसे झाले माझे च मला 
 रोज तुझे स्वप्न उराशी जपत जाते 
 पापण्या पण त्या बद्दल बोलून जात होते
 लागले हे मन माझे आज बावळू
माझेच मला कळेना कसे याला सावरू"" ...... हि ओळ लिहीत तिने डायरी बंद केली



                                 होईल का माझे नि तिचे काही ? बोलू का तिच्याशी ? ती कॉलेज ला नव्हती तेव्हा ह्याने तिची सगळी माहिती काढली होती , म्हणून तो त्या रात्री तिच्या घराकडे चक्कर मारायला आला . ती आपल्या बाल्कनी मध्ये बसून होती , तो तिला दिसताच ती लपून बसली
ती - हा काय करतोय इकडे ,  नि का आलाय हा ?
अरे देवा!! काय हे?  वेड-बीड लागले की काय याला.
जाऊ का मी खाली बोलू का त्याच्याशी , पण बोलू तरी काय , नि का म्हणून मी खाली जाऊ , कुठल्या नात्यांनी , बापरे बाप !
ती त्याला बघतेय हे त्याला ठाऊक होते तो हसत होता . .
तो - वेंधली लपायचे होते तर नीट तर लपायचे ना , वेडी
त्याने मनाशी पक्क केले होते माझ्या आयुष्यात मला आता ही वेंधलीच हवी आहे  आणि तो तिथून निघून गेला . हिचे मात्र " हृदयाचे स्पंदने तीव्र गतीने वाढु लागले " हि विचारात  होती तेवढ्यात आई ने तिला आवाज दिला .
ती - हो अग आले .
आई - अग ये लवकर , बघ कोण आले ।
ती - कोण आलंय ?
बाबा- अग बाहेर येणारेस का आता .
ती - बरं । आलेच
ती बाहेर येताच तिला धक्का बसला कारण तिने विचार पण नव्हता केला की असे काही होईल ते . तिच्या डोळ्यात एक प्रकारची भीती , अश्रू , आशा , नि हजार प्रश्न तिच्या डोक्यात रेंगाळत होती . तु Sssss , तू इथे काय करतोय नि या वेळी का? तेवढ्यात आई बोलली- अग त्याला बसायला सांगायचे  सोडुन चिडते का आहे त्याच्यावर .
ती - अग आई पण हा इथे का नि कश्याला आलाय , काय रे !! काय काम आहे तुला.
तो - काय काम म्हणजे , मी तुला मुळात भेटायला आलोच नव्हतो , मी तर काका काकुं ना भेटायला आलो . त्याचे बोलणे पूर्ण होत नाही तर बाबा मधेच बोलत , अग हाच तो ज्याने माझी मदत केली होती , आता मला हा रस्त्याने भेटला तर घेऊन आलो त्याला घरी , म्हटले की तुझी भेट घालवून देतो , तर तु चक्क चिडते आहे त्याच्यावर . काय झाले काय माहिती या वेडी ला उगाच चिडचिड करत असते आपली .
ती त्याच्या कडे रागात बघत खोटी खोटी हसत निघून गेली .
नाही म्हणता म्हणता थोडा का होईना त्यांच्यात सवांद झाला होता तो गोड तिखट का होईना पण सवांद तर झालाच ना . आणि तो पण खुश होत तिथून निघून गेला .




                                      दुसऱ्यादिवशी सगळे काही बद्दलेले होते. आज चक्क दोघे आनंदात होती , ती गेट समोर येऊन उभी राहिली तर चक्क येणारे जाणारे तिला गुलाब देत होते . ती गोंधळून अरे मला का देताय सगळे नि कोणी सांगितले तुम्हाला हे ? दुरून तो आपल्या हातात गुलाबाच्या फुलांचा गुच्छा घेऊन उभा होता आणि त्याची पहिली gf पण तिथे होती . अख्ख्या कॉलेज ला माहिती होते आज काय होणार होते . हिला मात्र त्याची कल्पना पण नव्हती .  ती थोडी लाजत , थोडी घाबरत पुढे आली . तिचा चेहरा लाल झालेला बघून तो हसला ,
ती - हे काय नि कोणासाठी ?नि हसायला काय झाले तुला ?
तो - कुठे काय , पण तू लाजत का आहेस ? नि लाल का पडलीस एवढी हा ?
ती - त्याला मारत , मग सगळे लोक हे गुलाब मला का देताहेत ? नि तू का असा नटून वैगेरे आलास .
तो - अरे देवा , ह्या लोकांना ना नीट काम पण नाही करता येत .
ती - म्हणजे ?
तो - अग नवीन मॅडम येत आहे , तर सगळे त्यांच्या साठी होते
ती रागात येऊन तिथून निघून जाणारच , तेवढ्यात त्याने तिचा हात पकडला , वेडी ! कोणासाठी असेल हे , अर्थात तुझ्यासाठीच ना . आता plz वाद नको , "बहोत मुश्किल से दिल कि बाते इन ओठो पर आई हैं , अब इस वक्त को बिघडना मत पगली"  त्याला असे बघून ती  आचर्यचकित झाली . हळूच तिला जवळ खेचून तिच्या कपाळावरचे चुंबन घेत ,  त्याने तिला एकदाचे विचारले

तो - आयुष्यभर या देवदास ला सहन करशील का ?
ती - का ? मी कोण तुझी ?
तो - तु मैत्रीण तर नाही नि नाही माझे पहिले प्रेम .
ती - रुसून । मग कोण मी?
तो - वेडी । श्वास आहेस तु माझा , ज्याच्या शिवाय मी अपुर्ण आहे .
ती - लाजत ! छान बोलतोस , पण पचायला जड जातंय ..... (थोडी हसून )
तो -अच्छा जी , मस्करी च्या मूड मध्ये हा , ठीक आहे मग तुझी इच्छा
ती - गप ये , आधी खुप त्रास झाला आता नको,  बस!
तो- लग्न करशील .
ती - काय ! लग्न(ती थोडी  लाजत , थोडी हसत )
तो - का ?(आश्चर्यचकित होत )
ती - हिम्मत असेल तर घरी येऊन मागणी घाल
तो - आजच येतो . हळूच त्याने तिला आपल्या दोन्ही हाताने ओढले , और अपने बाहोमे ले लिया ......

सकाळ चा गजर होताच तो तातडीने उठला नि बघतो तर काय सकाळचे ६ वाजले होते आणि बाहों तकिया  थी
, अरेच्या स्वप्न होते तर ते , तिच्या घरून आल्यांनतर तिच्या एवढ्या विचारात मग्न झाला होता कि स्वप्नात पण तीच त्याला दिसून आली
धत 'तेरी कि , स्वप्न होते हे .....😓😓😓😓😓😓😓. 



क्रमक्ष :

Sunday 24 February 2019

अव्यक्त झालेले प्रेम .....भाग १

तो आतून खचलेला कारण पहिल्या प्रेमापासून मिळालेला विश्वासघात त्याला कदाचित पचवता आला नसावा म्हणून , हिरमुसलेला त्याचा चेहरा पाहताच क्षणी वाटणारी त्याची काळजी कुठे तरी तिच्या मनात जाऊन बसले होते . आज बोलावे उद्या बोलावे त्याच्याशी म्हणून ती धडपडत होती . ती मात्र एकदम बिनधास्त , मनात येईल तसे वागायचे . वाटेल तेव्हा कधी कोणाशी हि  मस्ती करायची  असा तिचा स्वभाव . मित्र मैत्रिणी नि घेरलेली  . अगदी आनंदात नि कुठल हि टेन्शन न घेणारी अशी ती . चुकून तो तिच्या नजरेस पडला . जरा विचित्र पण गोड असा तो ,त्याचे मात्र तिच्या कडे लक्ष नव्हते . कारण तो "दर्द भरे मैफिल को हि अपनी जिंदगी मानने लगा था। "  


        हि मात्र रोज त्याला नोटीस करू लागली , आज कदाचित त्या वेड्याचे  लक्ष तिच्याकडे जाईल नि हि त्याला आपली गोड नि स्मित हास्यानी त्याच्याशी मैत्री करेल, असे तिला वाटत होते .एकीकडे तो त्याच्या दुःखात आपले दिवस मोजत होता नि दुसरी कडे मात्र हिच्या मनात त्याचा विचार चालू होता . का बरं हा असा आहे ? मेल्या थोडं बघत पण नाही माझ्या कडे ! ती हळूच मनात बोलू लागली . अजून तो  ह्या गोष्टीं पासून लांब होता . त्याला त्याच्या आजूबाजूला काय चालू याचे सुद्धा चाहूल नव्हती ,मग हिच्याकडे बरें कसे लक्ष जाईल ना ! 
              हळूहळू तिचे मन काही केल्या ऐकत नव्हते . हे देवा कसे होणार माझे काय चालू आहे . का मी एवढा त्याचा विचार करत आहे . ती आज कॉलेज ला गेली नव्हती , कारण तिला तशी इच्छा नव्हती . रोज चे मित्र- मैत्रिणींशी बोलणे आता तिला नकोसे  वाटू लागले  . सतत तिच्या विचारांनी घरचे पण त्रासले होते . "काय हि ?  अशी का वागत आहे? " आई चे शब्द तिच्या कानी पडले . ती - अग आई ! काय ! कुठे काय , काही तर नाही . आई - हो ना ! मग आज कॉलेज ला का नाही गेलीस  , काही झाले का ? 
ती - नाही ग आई ! काहीच नाही , सहज आपले घरी थांबली .
आई- बर बाबा ! तुझी ईच्छा .
आई रूम मधून निघून गेली , आणि ती परत त्याच्या विचारात मग्न झाली . 

                           इकडे कॉलेज मध्ये नेहमी प्रमाणे तो आला . पण आज त्याला ती दिसली नव्हती . आज तिच्या गृप मध्ये ती अदृश्य होती . सगळे तिच्या बद्दल बोलत होते की आज ती का नाही आली . हे संभाषण तो ऐकत होता . तो नकळत तिच्या जुन्या खोडकर स्वभावामध्ये रमुन  गेला . कुठे तरी तो परत हिरमुसला गेला  . कारण थोडं का होईना तो तिच्या मुळे नकळत हसत होता .हे मात्र तिला माहिती नव्हते . त्याचे डोळे तिच्या येणाऱ्या रस्त्याकडे टिपले होते , पण ती अजून पर्यन्त आली नव्हती . हळूहळू त्याला मात्र  याचा त्रास होऊ लागला , तो अस्वस्थ झाला  कारण रोजची नेहमी दिसणारी ती व्यक्ती आज त्याच्या डोळ्यासमोर नव्हती . नि महत्वाचे म्हणजे हे दुःख तो कोणाला सांगू शकत नव्हता कारण त्याचे असे आपली  मानणारी एक पण व्यक्ती त्याच्या आयुष्यात नव्हती . कॉलेज चा तो दिवस  संपायला आला  मात्र तिची अजून पर्यन्त काहीच खबर नाही हे बघून त्याने आपलेच काही तरी चुकले असावे असे गृहीत पकडले . 

पण तो थोडा confuse  होता की ती नसण्याने किंवा असण्याने मला का फरक पडत आहे , असे अचानक का म्हणून मी तिचा विचार करायला लागलो . का माझे डोळे तिला शोधण्यासाठी तडफडत आहे , माझे मन का तिच्या कडे ओढल्या जात आहे , मन तर मन पण डोळे का तरसायला लागलेत तिला पाहायला . हे काय होतंय नि का ? असे हजारो प्रश्न त्याच्या डोक्यात रेंगाळत होती . 

                   आज चा दिवस संपला,  तो हताश होऊन त्याच्या रूम वर येऊन पडला नि हि इकडे त्याच्या विचारात जेवण वैगेरे विसरून बेड वर पडून होती . साधारणतः एक महिना असाच गेला , ना त्यांचे बोलणे होते नि ना हि त्यांचे एकमेकाला भेटणे . ती कॉलेज ला यायची तेव्हा थोडं का होईना  हि दोघे एकमेकांच्या नजरेसमोर असायची  . आता मात्र त्याला राहावत  नव्हते , रोज तिची वाट बघून तो दमला होता .नि इकडे ती त्याला काही केल्या विसरत नव्हती , ती पण त्यात गुंतली हे त्याला माहिती नाही व्हावं म्हणून ती कॉलेज ला जात नव्हती . दोघे हि एकमेकांच्या प्रेमापासून वंचित होते , कोणाच्या मनात काय चालले हे त्या दोघांना ठाऊक नव्हते म्हणून कुठे तरी ते त्या दडपणाखाली  आले  . अचानक एक दिवस त्याच्या लक्षात आले , कि जिच्या प्रेमासाठी मी काल पर्यन्त भांडत होतो आणि  जेल कैदी सारखा स्वतःला कोंडून ठेवले होते ती तर आता कुठे माझ्या आयुष्यात दिसत नाहीये  ,हा च  विचार करत तो झोपी गेला . . 

   क्रमक्ष : 

Thursday 23 June 2016

पाऊस नि शाळा ...एक अतुट नात

हल्ली पाऊस म्हटला तर डोळ्यांसमोर प्रश्न चिन्हाशिवाय काहीच दिसत नाही। कधी कोसळून परतीच्या प्रवासाला जाईल कदाचित त्याला सुद्धा ठाऊक नसावे। हळूच वरती ढगांकडे पाहिले तर नेहमी प्रमाणे कापसासारखे शुभ्र। मग कोठून तरी आठवणी मधल्या पावसाची भुरळ पड़ते , नि पाहता पाहता बालपणीच्या गोष्टी नि पाऊस चक्क डोळ्यांसमोर येऊन मस्ती करायला लागते।
                                                 अबब....... कसला तो पाऊस , एका पाठोपाठ थेंब पडून त्याची सरी व्ह्यायची नि नव्यानी जमिनीला बिलगायची। त्यात मातीला होणारा तो सुखद आनंद आणि भर पड़ते तो तिच्या गोड़ अश्या सुगंधाचा , मन नि डोळे ते दॄश्य मोठ्या कुतुहलाने अनुभवाचे। मातीचा झालेला चिखल जणू वाटे पावसाळी उटने नाही। छत्री किवा रेनकोर्ट मुद्दामुन घरी विसरायच कारण पावसाचा आनंद घ्यायला मिळायचा त्यात मारलेली शाळेला दांडी , पाऊस तर एक निम्मित असे।  त्याचाच आनंद घेत बालपणी ची गाणी गुनगुणायचो "ये ग ये  ग सरी , तुझे मडके भरी " , "सांग सांग भोलानाथ " त्या वेळेस भोलानाथ काही बोलायचा नाही, पण शाळेची घंटा मात्र रोज आपल्या वेळेवर वाजल्याशिवाय राहायची नाही ,  तसे पाहिले तर शाळेचे नि पावसाचे अतुट असे नाते आहे।
                                           
                                                   वर्गाच्या खिडकी मधे बसून बेधुंद पडणारा पाऊस नि हवेचा गारवा अंगाला शहारे आणून सोडतात ,त्यात कोठून तरी खमंग कांदा  भजींचा वास येऊन जिभेला भिडतो। पावसाला अंगा-खांद्यावर घेऊन सगळी थोरली असो वा लहान आपला आनंद द्विगुणा करतात  नाही ? नि नकळत पावसाळी कविता  लिहायला घेतात
                                                      " पावसाच्या सरी पडून गेल्या
                                                         मातीला असा गोड़ सुगंध सुटला
                                                         एक एक थेंब मनाला भिडू लागला
                                                         डोळ्यांना गारवा स्पर्श करुन  गेला
                                                         हळूच गालांवर केसांचा
                                                         लपंडाव सुरु झाला
                                                         नकळत मनातून शब्द फुटले
                                                         तीच शब्द लिहावेसे वाटले  "




Tuesday 31 May 2016

शाळा ....



                              आज पासून शाळा सुरु झाली . एकीकडे पावसाने हजेरी लावली तर दुसरी कडे चिमुकले आपल्या दप्तरांची ओझे पाठींवर नेउन आपल्या शाळेचा पहिला दिवस अनुभवला .
                           " शाळा म्हटली कि आठवत तो पहिला बेंच ,त्या साठी सुसाट वेगाने शाळेच्या मार्गाने पळायचो , महत्वाचे म्हणजे ""आपली कट्टी आणि दो "" . खट्याळ अशी मस्ती करत 11 चे कसे 5 वाजायचे हे चक्क विसरायचो. सगळे तास अगदी आनंदाने ऐकचो कारण नवीन अभ्यासक्रम ना 
                             मराठीच्या कविता तर दुसरीकडे गणिताचे सूत्र त्याला साथ आपल्या भारताचा इतिहास ,तो घडला कुठे तर आपल्याच भुगोलात , विज्ञान ने तर मनावर हक्क गाजवला होता भर पडली ती चित्रकलेची आडवे उभे चित्र काढून गुण मात्र पैकीच्या पैकी , जीवाचे रान तर पी . टी मध्ये व्हायचेत .





                                         शाळेची शेवटची  घंटा नि त्या मध्ये पडलेला पाऊस , वर्गात आधी आपली वह्या पुस्तके प्लास्टिक च्या पिशवी मध्ये घालून ठेव्हायचो आणि कसले हि भान न ठेवता आपल्याच विश्वात भिजायचो ...



१५ जून २०१५